Bollywood

Solar Panel Yojana: सरकार सोलार पॅनलवर देत आहे अनुदान; लगेच करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकार आपल्याला महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. अशीच एक नवीन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत वीज पुरवठा होणार आहे. तर कशा पद्धतीने आपल्याला वीज पुरवठा होणार आहे आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची आपण सविस्तर माहिती घेऊयात.

सरकार नेहमी आपल्या नागरिकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच अनुदान स्वरूपात मदत देत असते. आजकाल घरातील जवळपास सगळीच कामे विजेवरच होत असतात. परंतु गरीब लोकांना बीज बील परवडत नाही, त्यासाठी शासनाने सोलर पॅनल ची योजना आमलात आणली आहे. जेणेकरून आपण विजेचा वापर कितीही केला तरी आपल्याला लाईट बील येऊ नये. तर मित्रांनो या योजेसाठी आपण कसा अर्ज भरायचा. भारत सरकारची ही योजना कशा प्रकारची आहे? याची आपण माहिती पाहणार आहोत.

भारत सरकारने सोलर पॅनल ही योजना अमलात आणून देशातील लोकांना जवळपास 25 वर्ष वीज निर्मितीसाठी मदत केली आहे. मित्रांनो भारत सरकार हे आपल्याला घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देत आहे. विजेवर चालणाऱ्या वस्तू या सोलर पॅनल वरती चालणार आहे, त्यामुळे आपण वीज बिल मुक्त होणार आहोत तेही 25 वर्षांपर्यंत. ऊर्जा मंत्रालयाच्या सौरऊर्जा या योजने अंतर्गत केंद्र सरकारने नागरिकांना घरावर बसविण्यासाठी 1 किलो वॉट ते 10 किलो वॉट च्या पॅनलवर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. महावितरणच्या मदतीने सरकार हे नागरिकांना वितरीत करत आहे. केंद्र सरकारने महावितरण साठी 25 मेघा वॉट चे अनुदान दिले आहे.

Jobsfeed

शासनाकडून घरगुती वापरासाठी 1 ते 3 किलो वॅट पर्यंत 40 टक्के अनुदान तर 3 कीलोपेक्षा जास्त 10 ते 20 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक वापरासाठी 500 किलो वॅट पर्यंत 20 टक्के अनुदान दिले जाते. अशा पद्धतीने आपण भारत सरकारने आणलेल्या या सोलर पॅनल योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. या बद्दल अधिक माहिती आपल्या पंचायत समिती मध्ये मिळते. तसेच या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म आपण भरू शकतो. त्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन भेट घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button