शोएब अख्तरची प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, मागत होता प्रार्थनेची भीक….

मित्रांनो, एखादी व्यक्ती कितीही तंदुरुस्त दिसत असली तरी तो नेहमी आरोग्याशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतो. वाढत्या वयाबरोबर अनेक आजार शरीराला जडायला लागतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे चांगले. कारण उपचाराला उशीर झाला तर आजार खूप वाढतो, त्यावर उपचाराचाही काही परिणाम होत नाही.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरबाबत बातमी समोर आली आहे, बातमीनुसार शोएब अख्तरला रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. शोएब सध्या खूप अडचणीत असल्याचं बोललं जात आहे.
शोएब अख्तरने स्वत: एका व्हिडिओमध्ये त्याचे दुःख सांगितले आहे आणि ते त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. अखेर, शोएब अख्तरला अचानक असे काय झाले की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या खूप अडचणीत आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात दाखल असून, ऑपरेशननंतरचा व्हिडिओ शेअर करून तो वेदना आपल्या सर्व प्रियजनांसोबत शेअर केला आहे.
रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएबला चाहत्यांच्या प्रार्थनांची गरज आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या या माजी वेगवान गोलंदाजाने हॉस्पिटलच्या बेडवरून एक व्हिडिओ बनवला आणि त्याची अवस्था सर्वांसोबत शेअर केली आहे.
जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शोएब अख्तरच्या गुडघ्यावर ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या अंथरुणावर आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की तो खूप अडचणीत आहे आणि त्याला चाहत्यांच्या प्रार्थनांची गरज आहे.
View this post on Instagram