बिग बॉस 16 मध्ये होस्टची फी शोच्या बजेटपेक्षा जास्त असेल? सलमान खान मागतोय एवढे हजार कोटी!

बिग बॉसची बातमी येताच सलमान खानच्या फीबाबत चर्चा सुरू झाली. या वर्षी देखील सलमानच्या बिग बॉस 16 च्या फीसच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने सीझन 16 साठी एक हजार पन्नास कोटींची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. सलमान खानसाठी हा बिग बॉसचा 13वा सीझन असेल, आतापर्यंत त्याने कलर्स टीव्हीवर बिग बॉसचे 12 सीझन होस्ट केले आहेत. इतक्या वर्षांनी असा शो होस्ट करणारा तो पहिला सेलिब्रिटी होस्ट आहे.
सलमानने तीनपट फी वाढवली?
सलमान म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी त्याने कोरोना महामारी लक्षात घेऊन बिग बॉसची फी कमी केली होती. सलमानने सांगितले की, जरी त्याला कमी फी मिळाली तरी तो चालवू शकतो, परंतु बिग बॉसमध्ये काम करणाऱ्या प्रॉडक्शन टीमच्या लोकांच्या पगारावर कोणताही परिणाम होऊ नये आणि बजेटमुळे लोकांना कामावर घेण्यात कोणतीही कमतरता येऊ नये. गेल्या वर्षीही सलमानने त्याच्या फीबाबत निर्मात्यांशी बोलणी केली नव्हती. आता तीन वर्षांनंतर तो निर्मात्यांना तिप्पट फी वाढवण्यास सांगत आहे.
सलमान खानच्या होस्टिंगची ही एक झलक
Pratik doesn’t need to defend himself, uske liye Bhai hain vhan😂✌️#PratikSehajpal #PratikFam #BBKingPratik #BiggBoss15 #WeekendKaVaar pic.twitter.com/z8XWZxIS8P
— Ashh💎 (@asthaaaaaa23) January 1, 2022
फी वाढवली नाही तर सलमान खान शो होस्ट करणार नाही?
मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या रिपोर्ट्समध्ये असेही लिहिले आहे की, सलमानच्या वतीने सांगण्यात आले आहे की, जर त्याला एक हजार पन्नास कोटी फी दिली नाही तर तो बिग बॉस 16 होस्ट करणार नाही. सलमानची ही कथित फी शोच्या बजेटपेक्षा जास्त असल्याचे दिसते. बिग बॉस 15 च्या दरम्यान, सलमान खानची फी 350 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु सलमान खानने ते खोडून काढले. आता 1 हजार 50 कोटी फीच्या बातमीवर दबंग खान काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फीमागील सत्य काय आहे
अभिनेत्यांच्या फीबाबत अनेकदा व्हायरल होणाऱ्या आकडेवारीत तथ्य नाही. सलमान खानच्या बिग बॉस 16 ची कथित फी केवळ टीव्ही रिऍलिटी शो नाही तर एका बिग बजेट चित्रपटापेक्षाही जास्त आहे. शोमधील सर्व प्रायोजकांची गुंतवणूक लक्षात घेता ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे दिसते.