पदर खांद्यावर राहिना! सई ताम्हणकरचा हॉट अंदाज, फोटोंवरून हटणार नाही नजर


मराठीतील ग्लॅमडॉल असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आताही तिने तिचे काही हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सई नेहमीच आपल्या फोटोंनी सगळ्यांना ग्लॅम स्टेटमेंट देत असते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती सगळ्याच स्टाइल अगदी उत्तमरित्या सांभाळते. या फोटोंमध्ये देखील ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या साडीत दिसत आहे. साडीवर काळ्या रंगाचे प्रिंट आहेत. त्यावर तिने स्लिव्हलेस डीप नेक ब्लाउजला पसंती दिली आहे. पांढऱ्याचं रंगाचे मोठे कानातले आणि केसांची उंच पोनीटेल अशा हटके ढंगात ती दिसत आहे. फोटोंमध्ये ती निरनिरळ्या पोज देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंवरही चाहते फिदा झाले आहेत. चाहते या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाइक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. कामाबद्दल सांगायचं तर सई यापूर्वी ‘मिडीयम स्पायसी’ या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे देखील होते.
