पाहा किती बदललीये आर्ची; रिंकू राजगुरूंच्या Bold अदा पाहून चाहते घायाळ

रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची तिने इंस्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत जे पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, चाहते तर घायाळ झाले आहेत. रिंकूने नुकतेच एक फोटोशूट केले आहे यात ती कमालीची सुंदर दिसत आहे, पर्पल रंगाच्या ब्लाउज मध्ये ऑफ व्हाईट रंगाच्या घेरवाल्या ड्रेस मध्ये सॉफ्ट मेकअप आणि मेस्सी बन लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे.

रिंकूने फोटो अपलोड करताच त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु झाला, चाहते रिंकूच्या नवीन अदांवर फिदा झाले आहेत. रिंकूने सैराट चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरवात केली होती पदार्पणातच सैराट चित्रपटाला अफलातून यश मिळालं आणि एका रात्रीत आर्ची घराघरात पोहचली त्यानंतर रिंकू समोर मोठमोठ्या चित्रपटांची रांग लागली.

कागर , आठवा रांग प्रेमाचा , 100, मेकअप सारख्या सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये काम केलं. फिटनेसच्या बाबतीतसुद्धा रिंकू प्रचंड ऍक्टिव्ह आहे, सोशल मीडियावर रिंकू व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ फोटो उपलोड करत असते.
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.
रिंकूनं पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू ही खास लूकमध्ये दिसत आहे. मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस अशा लूकमध्ये रिंकू दिसत आहे. रिंकूच्या या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.