चित्रपटश्रुष्टीला पुन्हा मोठा धक्का, सर्वाना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तवचे निधन.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवचे आज निधन झाला, ही सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे, कॉमेडियन राजू श्रीवास्तव याला 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राजू श्रीवास्तव हे दक्षिण दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना अचानक खाली पडले. त्या नंतर त्याला त्याच्या प्रशिक्षकाने रुग्णालयात नेले आणि त्याला सीपीआर देण्यात आले व नंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे कवी होते. राजू श्रीवास्तव यांची लहानपणापासूनच कॉमेडी मधे चांगली नक्कल होती आणि तो कॉमेडियन होणार हे त्यांना नेहमीच माहीत होते.
राजू श्रीवास्तव, ज्याचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले आहे, त्यानी आपल्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून केली. जसे की मैने प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवाचा रिमेक आणि आमदानी अठानी खर्चा रुपैया यांसारख्या हिंदी चित्रपटा मध्ये काम केले आहे.
त्याने बिग बॉस 3 मध्ये देखील भाग घेतला होता जेथे तो दोन महिन्यांहून अधिक काळ घरात राहिला. नंतर त्यानी कॉमेडी का महा मुकाबला या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला. 2013 मध्ये, कॉमेडियन त्याच्या पत्नीसह नच बलिए सीझन 6 मध्ये सहभागी झाला होता. तो कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये देखील दिसला आहे.