Bigg Boss 16: ठरलं! बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

‘बिग बॉस’ मराठी प्रमाणेच सध्या हिंदी बिग बॉसच्या घरातसुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. यंदाचं हे 16 वं पर्व सध्या फारच गाजतंय. या घरात रोज काही ना काही वाद होत असतात. या वादात रागाच्या भरात केल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे अनेक स्पर्धक चर्चेचा विषय ठरतात.
आता मराठी बिग बॉस प्रमाणेच हिंदी मध्येही वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती. आता त्याप्रमाणेच हिंदी मध्येही लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉसच्या घरात राडा घालायला येणार आहे.ही अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. याशिवाय ती बिग बॉस ओटीटी मध्ये देखील सहभागी झाली होती.
‘बिग बॉस 16’ची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी निर्माते दरवेळी नवीन शक्कल लढवताना दिसतात. आधी या घराचे शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचे भांडण गाजले आणि आता बिग बॉस वाइल्ड कार्ड एंट्री चर्चेत आहे.
‘बिग बॉस 16 ’ मधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकच नाही तर स्पर्धकही उत्सुक आहेत. अखेर हे गुपित समोर आलं आहे. ही स्पर्धक आहे मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रिधिमा पंडित.
शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन काही दिवसांपूर्वी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांबद्दल बोलत होते. त्यांचे म्हणणे होते की, ‘कोणीही वाइल्ड कार्ड स्पर्धक येईल ती मुलगीच असली पाहिजे. इथे प्रत्येकाने स्वतःसाठी जोडीदार शोधला आहे. आम्हालाही कोणाची तरी गरज आहे.’ आणि आता वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून रिधिमाचं नाव पुढे आलं आहे.
त्यामुळे रिधिमाच्या येण्याने घरात आता काय घडामोडी घडणार ते पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय रिधिमा या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये दिसणार की अचानक सर्व स्पर्धकांना सरप्राईज मिळेल हे अद्याप कळलेले नाही.
रिधिमा पंडितने ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर रिधिमाने ‘यो की हुआ ब्रो’, ‘आय एम बिकॉज ऑफ अस’, ‘हैवान द मॉनस्टर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. रिधिमा पंडित बिग बॉस ओटीटीमध्ये देखील सहभागी झाली होती परंतु ती लवकरच ती त्यातून बाहेर पडली.
याशिवाय रिधिमाचे ‘बुलेट ते सावर’ हे गाणे लवकरच रिलीज होणार आहेर. या गाण्यात तिच्यासोबत भारती सिंग दिसणार असून हे गाणे गायक श्रीरामने गायले आहे. तिच्या या गाण्याबद्दल अभिनेत्री खूप उत्सुक आहे.आता तिच्या येण्याने बिग बॉसच्या समीकरणं कशी बदलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.