‘बिग बॉस मराठी ४’ मधून बाहेर पडताच रुचिराचं रोहितसोबत ब्रेकअप? या कारणामुळे चर्चेला उधाण

रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्यापासूनच चर्चेत होते. गेल्याच आठवड्यात रूचिरा बिग बॉस शोमधून बाहेर पडली. या शोमध्ये रोहित आणि रूचिरा हे स्पर्धक म्ह्णून दिसत असले तरी त्यांच्यातील खास नातंही अनेक क्षणांमधून लपत नव्हतं.
पण रूचिराने शोमधून बाहेर पडताच रोहितसोबतचं नातं संपवलं आहे. सोशलमीडियावरून रूचिराने रोहितला अनफॉलो केल्यामुळे या शंकांना उधाण आलं आले. ऑल इज वेल म्ह्णत ज्या शोमध्ये ही जोडी दिसली त्या शोमधून बाहेर पडताच ऑल इज नॉट वेल असं म्हणण्यासारखं रूचिरा आणि रोहितच्या नात्यात नेमकं काय झालं हा प्रश्न अर्थातच् या जोडीच्या चाहत्यांना पडला आहे.
बिग बॉस मराठीचा प्रत्येक सिझन छोट्या पडद्यावर गाजतो. हिंदी असो किंवा मराठी आजवर बिग बॉसच्या घरात दोन स्पर्धक एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि त्यांना घरात चिडवलं जाणं अगदी सामान्य होतं. प्रेक्षकही प्रत्येक सिझनमध्ये घरात प्रेमाचे वारे कधी वाहतायत याची आतुरतेने वाट पाहतात.
मात्र ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये काहीतरी वेगळंच घडलंय. यावेळेस घरात पूर्वीपासूनच प्रेमात असलेली एक जोडी आली होती. मात्र घरात घडलेल्या काही घटनांचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाल्याचं दिसतंय. गेल्या आठवड्यात घराबाहेर गेलेल्या रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे यांच्या नात्यात आता दुरावा आल्याचं बोललं जातंय.
रुचिरा आणि रोहित घरात येण्यापूर्वीच नात्यात होते. मात्र आता सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. रुचिरा आणि रोहित गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. घरातदेखील सगळ्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडत होती.
मात्र मागील आठवड्यात घडलेल्या काही घटनांमुळे रोहित आणि रुचिरा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय. रोहितने सगळ्यांसमोर रुचिराची बाजू न घेतल्याने ती नाराज होती. तर चावडीवरही महेश मांजरेकर यांनी रोहितला या गोष्टीचा जाब विचारला होता.
त्यावेळी महेश मांजरेकर म्हणाले “अक्षय आणि अपूर्वा तुला रुचिराबद्दल सांगत होते तेव्हा तू तिची बाजू का घेतली नाही” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र याच आठवड्यात रुचिरा घराबाहेर गेल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला. रुचिरा घराबाहेर झाल्याने रोहित प्रचंड दुःखी झाला होता.
मात्र आता घराबाहेर पडलेल्या रुचिराने रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता त्यांचे चाहते गोंधळात पडले आहेत. नेटकऱ्यांनीही यावर आपल्या प्रातिक्रिया दिल्या आहेत. हे सगळं फक्त कार्यक्रमासाठी होतं का, असा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे.
तर दुसऱ्याने रुचिरा पूर्वीपासून कुणालाच फॉलो करत नसल्याचं म्हटलं आहे. रुचिराने मात्र याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण सध्या ह्या दोघांच्या बाबतीतफूट पडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरताना पाहायला मिळत आहेत.