राधिका आपटे यांचा जीवन परिचय

राधिका आपटे म्हटलं कि डोळ्यापुढे येते ती एक बिनधास्त मुलगी जी कॅमेऱ्या पुढे अजिबात लाजत नाही आणि म्हणूनच तिने चित्रपट सृष्टीतील या स्पर्धात्मक जगात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. अभिनयात तर ती सरस आहेच पण ती काही बोल्ड दृश्ये सुद्धा बिनधास्त देते.
तिचे पार्चड, हंटर सारखे चित्रपट आपण पहिले असतीलच. त्यावरून तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्वाची आणि दिलखुलास अभिनयाची प्रचिती येते. चला तर जाणून घेऊया हिंदी/मराठी चित्रपट श्रुष्टीतील या बिनधास्त अभिनेत्री विषयी.
राधिका आपटे यांचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी तामिळनाडू मधील वेल्लोर येथे झाला.(Radhika Apte age) त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आई वडील वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकि चा अभ्यास करत होते. त्यानंतर तिचे वडील डॉ. चारुदत्त आपटे पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाचे न्यूरो सर्जन आणि चेअरमन झाले.
त्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणिताची पदवी मिळवली. सुरुवातीला त्यांनी निंयमितपने शाळेत शिक्षण घेतले पण त्यानंतर त्यांनाही घरूनच शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला. त्यांच्या बरोबर त्यांच्या सोसायटी मधील त्यांचे आणखी चार मित्र सुद्धा होते.
यात स्वतंत्र आणि मोकळेपणाचा अनुभव घेतल्यामुळे राधिका आपटे यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला. पुण्यात राहत असताना राधिका आपटे यांनी कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडे आठ वर्षे प्रशिक्षण घेतले. याच काळात राधिका आपटे यांनी पुण्यातील थिएटरमध्ये अभिनय आणि नृत्य करण्यास सुरुवात केली पण नंतर चित्रपटात कारकीर्द सुरु करण्याच्या इच्छेमुळे त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.