बॉलिवूड हादरलं ! प्रसिद्ध गायकाचे अपघाती निधन

बॉलीवूडमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडमधून संगीत क्षेत्रात करियर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या एका पंजाबी गायकाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे. आम्ही याबद्दलच आपल्याला माहिती देणार आहोत.
गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. अनेक कलाकारांचे हृदयविकार किंवा अपघाती निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कधी कोणाचे काय होईल याचा काही नेम नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये आपण बॉलीवूडमधून अनेक कलाकारांना गमावले आहे.
सुशांत सिंह राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर, बप्पी लहरी, लता मंगेशकर, रमेश देव, श्रवण राठोड यांच्यासह अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. तर आता देखील एका पंजाबी कलाकाराचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक निरवैर सिंह यांचे ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय केवळ 42 वर्षाचे होते.
पंजाबी चित्रपटसृष्टी मध्ये त्यांनी अनेक गीत गायलेले आहेत. त्यांचे गीत खूप लोकप्रिय ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी काळात त्यांच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील होत्या, असे सांगण्यात येते. त्यांच्या निधनाची बातमी कळतात पंजाबी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील काही चित्रपटांसाठी गाणे देखील गायले आहे.
शुक्रवारी रात्री मेलबर्न येथे हा अपघात झाला. सिंह हे आपल्या कारने जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चुराडा झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका व्यक्तीला अटक केली आहे. सिंह हे घरातून काही कामासाठी बाहेर निघाले होते.
त्यानंतर त्यांच्या गाडीला हा अपघात झाला आणि यातच त्यांचे निधन झाले. या अपघातामध्ये त्यांच्यासोबत आणखीन एक जण होता. त्याला देखील दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तेरे बिन या अल्बम मध्ये त्यांनी अतिशय लोकप्रिय असे गाणे गायले होते. नऊ वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते.
ऑस्ट्रेलियामध्ये ते स्थायिक झाले होते. ऑस्ट्रेलियामधूनच ते आपले करियर वाढवत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांचे मित्र व कुटुंबीय यांना खूप धक्का बसला आहे. अनेकांनी याबाबत संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.