पहा गौतमी पाटीलच्या गावाकडील घराचे फोटो…

गौतमी पाटील हे नाव सध्या सर्वत्रच चर्चेत आहे. फार कमी लोक असे असतील ज्यांना हे नाव माहित नाही. तस तर तिच्या लावणी या नृत्यासाठी ती ओळखली जाते मात्र खर सांगायचं झालं तर तिच्या डान्समुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.


तरुण तर जणू तिच्या मागे वेडेच झाले आहेत, कुठलाही सण असू द्या, कार्यक्रम असू द्या किंवा यात्रा असू द्या गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम तर असतोच असतो. आता अचानक कुठेही नसलेलं गौतमी पाटील हे नाव चर्चेत कस आलं?…तर गौतमी पाटील बद्दल अशाच काही गोष्टी आपण जाणून घेऊयात ज्यांबद्दल तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडत असतील.
महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील आजपर्यंत बरेच वेळा वा’दाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचे डान्सव्हिडीओ.. युट्युब, इंस्टाग्राम आणि फेसबुकला मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, या व्हिडीओज ला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज असतात. मात्र यातील काही व्हिडीओ इतके अ’श्ली,ल आहे की या व्हिडीओजमुळेच कलाक्षेत्रातील लोक तिच्यावर मोठ्या प्रमाणात भडकले आहेत.
आता ही गौतमी पाटील नेमकी कोण, जिला आतापर्यँत कुणीही ओळखत नव्हतं आणि जिचं नावही कधी ऐकलं नव्हतं तिची इतकी चर्चा का आणि नेमकं हे नाव समोर आलं कस? तर २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात तिचा एक अ’श्ली,ल डान्सचा व्हिडीओ व्हयरल झाला होता आणि या व्हिडीओनेच तिने सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले.

या व्हायरल व्हिडीओ नंतरच तिच्याप्रति लोकांची उत्सुकता वाढू लागली आणि ती कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न लोक करू लागले. मग काय प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्म वर तिचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आणि यानेच ती लाइमलाईटमध्ये आली. मूळची धुळे जिल्ह्याची असणाऱ्या गौतमीचे वय केवळ २६ वर्षे आहे.
ती गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. पूर्वी ती बॅकडान्सर म्हणून काम करायची, मात्र या लावण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे गौतमीचे सांगणे आहे.
पहिल्या लावणी कार्यक्रमातून ज्या गौतमीला ५०० रुपये मिळाले होते, तीच आज हजार ते लाख रुपयांपर्यंत मानधन घेते,
ते पण केवळ एका कार्यक्रमाचे. आता कुणी कुठल्याही परिस्थितून का येईना, मात्र अशा प्रकारच्या गोष्टी तर चुकीच्याच आहेत..नाही का? आता बघा ना गौतमी पाटील जिथे आपले नृत्य सादर करते, त्या कार्यक्रमांमध्ये केवळ तरुण किंवा पुरुषचं नसतात तर अगदी स्त्रिया आणि लहान मुलं देखील असतात.
गौतमी पाटीलने लावणीत विभत्स हावभाव आणि अंगप्रदर्शन केल्यामुळे कित्येक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. यात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि लावणी कलाकार मेघा घाडगेंचा देखील समावेश आहे, अशा तरुणी महाराष्ट्राची कला अ’श्ली,लतेकडे नेत असल्याचं सांगत त्यांनी तिचा विरोध केला आहे.
लोक तिच्या डान्ससाठी इतके वेडे आहेत की तिचा कार्यक्रम कुठेही असूद्यात अफाट गर्दी ठरलेलीच आहे. आता तिच्या एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत एकाचा संशयास्पद मृत्यू झाला, तर एका कार्यक्रमात लोक चक्क झाडांवर चढून तिचा कार्यक्रम पाहात होते. नुकतंच झालेल्या तिच्या कार्यक्रमात स्वतःच्या अंगावर पाणी टाकत तिने नृत्य केले,
या ठिकाणी प्रेक्षकांची इतकी गर्दी झाली की माघारी जाण्यासाठी गौतमीला पोलिसांच्या गाडीत बसून जावे लागले. यावरूनच कळतंय महाराष्ट्रात तीच किती क्रेझ वाढत चालली आहे. काहीही म्हणा मात्र हे येणाऱ्या पिढीसाठी तर अयोग्यच आहे. लावणी ही एक कला आहे, या कलेचा इतिहास अनेकांना माहित आहे, मात्र अ’श्ली,ल नृत्य सादर करणे, अ’श्ली,ल हावभाव करणे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणे म्हणजे लावणी आहे का? आणि याला लावणीचे नाव देणे हे कितपत योग्य आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद !!!