Bollywood

दोन्ही हात नसताना देखील अप्रतिम फोटोग्राफी करते हि व्यक्ती, जिद्द पाहून लोक देखील करत आहेत कौतुक…व्हिडीओ व्हायरल…

आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्याचा सामना करण्याची हिंमत आणि क्षमत प्रत्येकामध्ये नसते. काही लोक छोट्या छोट्या समस्यांवर देखील हार मानतात. तर काही लोक आपल्या जीवनामध्ये आलेल्या मोठ्या संकटांवर देखील मात करतात. अशी जिद्द आणि हिंमत पाहून लोक देखील दंग होतात. सोशल मिडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक अपंग व्यक्ती फोटोग्राफी करताना पाहायला मिळत आहे.

@BhatiaHarpal या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातामध्ये कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करताना पाहायला मिळत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये लक्षपूर्वक पाहिल्या तुम्हाला त्या फोटोग्राफर व्यक्तीचे दोन्ही हात दिसणार नाहीत. कॅमेरा पकडण्यापासून ते फोटोज क्लिक करण्यापर्यंत तो कोणाचीही मदत न घेता काम करताना पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीची जिद्द पाहून लोक देखील त्याचे कोतूक करत आहेत.

सोशल मिडियावर हा व्हिडीओ सध्या लोकांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे, जे छोट्या छोट्या गोष्टीवर हार मानतात. पण या व्हिडीओमध्ये अपंग व्यक्ती स्वतःच्या हिंमतीवर कॅमेरा पकडून फोटोशूट करताना पाहून लोकांना जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळणार आहे. जर तुम्ही देखील हिंमतीवर अडचणीचा सामना केला तर तुम्हाला देखील पुढे जाण्यास कोण अडवू शकणार नाही. ठीक तसेच एका लग्नामध्ये हि अपंग व्यक्ती कॅमेरा पकडून फोटोग्राफी करत आहे.

Jobsfeed

व्हिडीओच्या कॅप्शननुसार हि फोटोग्राफर व्यक्ती हरियाणाच्या करनाल येथील राहणारी आहे. या व्यक्तीचे नाव महेंद्र उर्फ काकाजी असे सांगितले जात आहे. कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे कि, भाऊमध्ये परिस्थितीसोबत लादण्याची अप्रतिम क्षमता आहे. खूपच उत्साही आणि मल्टी टॅलेंटेड आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी इक्यूपमेंटसचे सप्लायर देखील आहेत. यांना पाहिल्यानंतर पॉज़िटिव वाईब्सचा अनुभव येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button