तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये अंजली मेहताची भूमिका करनारी नेहा मेहता रिअल लाईफ मध्ये दिसते खूपच! पाहा फोटो…

नेहा मेहता मुळात गुजरातच्या भावनगरची असून तिचे वडोदरा आणि अहमदाबादमध्ये लहानपण गेले. ती गुजराती साहित्यात खोलवर रुजलेल्या कुटुंबातून आली आहे आणि ती स्वतः गुजराती वक्ता आहे. तिचे वडील एक लोकप्रिय लेखक आहेत ज्यांनी तिला अभिनेत्री होण्यासाठी प्रेरित केले. तिने मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स (एमपीए), इंडियन क्लासिकल डान्स आणि डिप्लोमा इन व्होकल आणि नाटकात पदवी मिळविली आहे.
नेहा मेहता यांनी बऱ्याच वर्षे गुजराती रंगमंचावर काम केले. इ.स. २००१ मध्ये झी टीव्ही चॅनेलवरील मालिका डॉलर बहु नावाच्या भारतीय दूरचित्रवाहिनीत अभिनय करून नेहा ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली . नेहा मेहता यांनी इ.स. २००२ ते २००३ मध्ये स्टार प्लस वरील भाभी या मालिकेत मुख्य भूमिका निभावली.
इ.स. २००८ मध्ये सब टीव्ही वरील मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये अंजली मेहता नावाच्या पात्राची भूमिका निभावली. नेहाच्या अभिनय कारकिर्दीतील ही प्रदीर्घ भूमिका आहे. याव्यतिरिक्त तिने अजून एक सब टीव्ही वरील मालिका वाह! वाह! क्या बात है!चे शैलेश लोढा सह सूत्र संचालन केले.