एकेकाळी ५०० रुपयांसाठी काम करणारी ‘गौतमी पाटील’ आज घेतीये इतके मानधन

अनेक दिवसांपासून गौतमी हे नाव खूप चर्चेत आहे. या नाव जरी नुसतं ऐकलं तरी तुफान गर्दी हे समीकरणच होऊन बसलं आहे. खूप कमी वेळामध्ये गौतमी पाटील हि प्रेक्षांमधे लोकप्रिय झाली आहे. ती नेहमीच तिच्या डान्स आणि अश्र्लिलतेच्या कारणावरून वादात सापडली होती.
तीला अनेकदा तिच्या अशील हाव भाव आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल देखील करण्यात आले. अशो परंतु तिला या सर्वाचा फायदाच होत गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण ती आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. तिच्या कार्यक्रमांना आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
पण या आधीचे जीवन तिचे खूप हलाकीचे होते. तिला या साठी आपले शिक्षण देखील अर्ध्यातूनच सोडावे लागले होते. त्या माघील आणि तिचा जीवनप्रवास आपण थोडक्यात जाऊन घेणार आहोत. अनेकांना आज प्रश्न देखील पडला असेल कि नक्की कोण आहे हि गौतमी पाटील?
धुळ्यातील शिंदखेडा या गावात गौतमीचा जन्म झाला. जन्माच्या काही दिवसांनंतरच तिचे वडील तिच्या आईला आणि तिला एकटे सोडून निघून गेले. त्यानंतर आई आणि ती आपल्या अजोळीच राहू लागल्या. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने पुढे ती डीजे शो मध्ये एक डान्सर म्हणून काम करू लागली.
तिने या क्षेत्रात तेंव्हा पासूनच आपले पाय रोवायला सुरवात केली होती.गौतमीला तेंव्हा पासूनच गाव असो किंवा शहर कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवले जात होते. तिने या क्षेत्रात वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षापासूनच सुरवात केली होती. आज ती २७ वर्षाची असून. तिचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
पुढे ते पुण्यात आले. दरम्यान आईचा पी यम टी बसमधून पडून अपघात झाला आणि घराची पूर्ण जबाबदारी गौतमीवर आली. त्यानंतर ती अनेक ठिकाणी बॅकग्रांऊड डान्सर म्हणून काम पाहू लागली तेंव्हा तिला फक्त ५०० ते १००० रुपये मिळत होते.