Bollywood

आर्चीसाठी रिंकूऐवजी ‘या’ अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा सिनेमा म्हणजे ‘सैराट’ (sairat). नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने मराठी कलाविश्वात तुफान लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रिंकू राजगुरू (rinku rajguru) आणि आकाश ठोसर (aakash thosar) ही जोडी रातोरात सुपरस्टार झाली. विशेष म्हणजे आजही या जोडीवर प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. या सिनेमामध्ये आर्ची ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी अन्य एका अभिनेत्रीला पहिली पसंती दिल्याचं समोर आलं आहे.

‘लोकमत फिल्मी’च्या नो फिल्टर या सेगमेंटमध्ये अलिकडेच आकाश ठोसर आणि सायली पाटील (sayali patil) या जोडीने हजेरी लावली होती. या दोघांचा ‘घर बंदूक बिरयानी’ (ghar banduk biryani)  हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने या जोडीने त्यांच्या फिल्मी करिअरवर भाष्य केलं. यात सायलीने सैराटसाठी माझी निवड झाल्याचं सांगितलं.

वडिलांच्या कडेवर बसलेल्या ‘या’ चिमुकलीने लावलं महाराष्ट्राला ‘याड’; तुम्ही ओळखलं का तिला?

Jobsfeed

 ”मी अपघाताने अभिनेत्री झाले आहे. मी कोणत्याही सिनेमासाठी कधीही ऑडिशन द्यायला गेले नव्हते.मी कॉलेजमध्ये असताना सैराटसाठी शॉर्टलिस्ट झाले होते. माझ्यासारख्याच इतरही ४-५ मुलींची निवड झाली होती.त्यात चार, पाच ऑडिशन झाल्यानंतर नागराज सरांनी मला फायनल केलं होतं”, असं सायली म्हणाली.

Exclusive:…म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

पुढे ती म्हणते, “आता तू ऑलमोस्ट फायनल आहेस असं मला नागराज सरांनी सांगितलं होतं. पण, त्यावेळीही मला हा सिनेमा करायचा नव्हतं. त्यामुळे सरही मला समजवायचा प्रयत्न करत होते. पण, त्यानंतर माझ्यासाठी हा विषय बंद झाला आणि त्यानंतर सैराट आला. मात्र, मी कधीच स्वत:ला आर्चीच्या रुपात पाहिलं नव्हतं.”

दरम्यान, सायलीची निवड कॉलेजमध्ये असतानाच झाली होती. मात्र, काही कारणास्तव तिने सैराट करण्यास नकार दिला. परंतु, चार वर्षानंतर तिला नागराज मंजुळे यांच्या झूंड या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सध्या सायली घर बंदूक बिरयानी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button