अबब! अभिनेत्री बनण्यापूर्वी अशी दिसायची प्रियांका चोप्रा; फोटो होतोय तुफान व्हायरल…

वयाच्या १८व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर केला होता. तिला हा पुरस्कार २०००मध्ये मिळाला होता. तसेच यानंतर तिने अभिनेत्री म्हुणुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासाठी सर्वत्र ओळखली जाते. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये सुद्धा तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. परंतु ही अभिनेत्री प्रसिद्ध होण्यापूर्वी कशी दिसत होती याची प्रत देणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा अभिनेत्री होण्यापूर्वीची काही फोटो व्हिडिओच्या स्वरूपात व्हायरल होत आहेत. तर हा व्हिडिओ प्रियांकाच्या एका चाहतीने शेअर केला आहे. हा विडिओ शेअर करत ती चाहती दावा करत आहे कि, तिची आई नव्वदच्या दशकामध्ये प्रियांकाला भेटली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये या चाहतीने प्रियांकाचे आईसह असलेले फोटो एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. तर या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियांका एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. प्रियांका तिच्या तरुणपणात कशी दिसते ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तसेच प्रियंकाने या व्हिडिओमध्ये सोनेरी आणि काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घेतला आहे. ती खूपच वेगळ्या लोककमध्ये दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा लुक पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ प्रयांकाच्या एका चाहतीने शेअर केला आहे. त्यावेळी तिने सांगितलं कि, प्रियांका करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बरेलीमध्ये राहत होती. त्यावेळी चाहतीची आई प्रियांका ओळखायची असंही व्हिडिओ शेअर करत त्या चाहतीने सांगितले आहे.